एसटी महामंडळ अधिकारी यांचे समवेत सातारा जिल्हाध्यक्ष श्री.हणमंतराव अवघडे
19/5/2019
*महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेच्या वतीने एसटी महामंडळ च्या राज्य व जिल्हास्तरीय अधिकारी यांची भेट स्मार्ट कार्ड बाबत चर्चा यशस्वी*
संघटनेच्या वतीने एसटी चे कार्यकारी अभियंता मुंबई मा.विनीत कुलकर्णी, सातारा विभाग नियंत्रक मा.सागर पळसुले, यंत्र अभियंता मा.अजितकुमार मोहिते,विभागीय अभियंता मा.प्रियांका काशिद, दहिवडी आगार व्यवस्थापक मा.मोनाली पाटील,कनिष्ठ अभियंता मा.पूनम सुतार यांची भेट घेवून अपंग व्यक्ती यांना एसटी महामंडळ यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सोयी सुविधा बाबत चर्चा झाली.या चर्चेत *स्मार्ट* कार्ड बाबत प्रामुख्याने चर्चा झाली.
*सातारा जिल्ह्यात वाई,सातारा,पाटण,कोरेगाव, मेढा, महाबळेश्वर* या तालुक्यात स्मार्ट कार्ड वितरण सुरु करण्यात आले असून उर्वरित तालुक्यात ही सुविधा लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मा.सागर पळसुले यांनी दिली.
*यासाठी समाज कल्याण यांनी दिलेले ओळखपत्र किंवा स्वावलंबन कार्ड,एक फोटो घेवून जावे*
दिव्यांग व्यक्तीच्यासाठी असणाऱ्या सुविधा प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे सांगितले. संघटनेच्या वतीने सर्व मान्यवरांचे आभार जिल्हाध्यक्ष हणमंतराव अवघडे यांनी मानले.